परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून मान्यता

 


अकोला,दि. 3(जिमाका)- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला अंतर्गत अकोला, परभणी जालना येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत. महाराष्ट्र शासनाने बियाणे अधिनियमानुसार परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून 1 फेब्रुवारी रोजीच्या राजपत्रानुसार मान्यता दिली आहे. अकोला येथील बीज परीक्षण प्रयोशाळेस यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

परभणी येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा राज्य बियाणे प्रयोगशाळेला मान्यता दिल्यामुळे आता कोणत्याही अधिसूचित वाणाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाण्याचे परीक्षण महामंडळाच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत करता येईल. तसेच शेतकऱ्यांना, खाजगी कंपन्यांना तसेच बीज प्रमाणीकरण यंत्रणेला बियाणे नमुन्याचे बीज परीक्षण गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा परभणी येथे करता येईल.

महामंडळाची प्रयोगशाळा ही राज्य बियाणे प्रयोगशाळा म्हणून अधिसूचित झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना उच्चतम दर्जाचे गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास महाबीजचे अध्यक्ष तथा  शासनाचे सचिव (कृषि) एकनाथ डवले आणि महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केले आहे. सर्व अधिकारी तसेच कर्मचारी यांना पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना