सार्वजनिक वितरण व्यवस्था: मार्च महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

 अकोला,दि.6 (जिमाका)- जिल्ह्याकरिता माहे मार्च २०२१ करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी दिली आहे.

त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

.क्र.

धान्याचा प्रकार

वाटप परिमाण

धान्य वाटपाचे किरकोळ दर

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु

 दोन किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  दोन रुपये

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ

दोन किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  तीन रुपये

प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी मका

एक किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  एक रुपया

अंत्योदय अन्न योजना तांदुळ

२० किलो प्रति कार्ड

प्रति किलो  तीन रुपये

अंत्योदय अन्न योजना मका

१० किलो प्रति कार्ड

प्रति किलो  एक रुपया

अंत्योदय अन्न योजना ज्वारी

पाच किलो प्रति कार्ड

प्रति किलो  एक रुपया

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु

चार किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  दोन रुपये

एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ

एक  किलो प्रति व्यक्ती

प्रति किलो  तीन रुपये

नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता

एक किलो प्रति शिधापत्रिका (साठा उपलब्धतेनुसार )

प्रति किलो  वीस रुपये

             वरील वाटप परिमाण गोदामातील साठयाचे लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले