अकोला,दि. 22(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.21) दिवसभरात झालेल्या 339 चाचण्या झाल्या त्यात 31 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
आज दिवसभरात अकोट
येथे 21, अकोट येथे 65, बाळापूर येथे 10, बार्शीटाकळी येथे
16, पातूर येथे आठ, तेल्हारा येथे 10 व हेगडेवार येथे तीन चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, मुर्तिजापूर येथे 148 चाचण्या झाल्या त्यात 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 58 चाचण्या झाल्या त्यात 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण 339 चाचण्यांमधून 31
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 34 हजार 320 चाचण्या झाल्या पैकी 2433 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा