अकोला,दि. 5(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 105 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय
खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बार्शीटाकळी
येथे दोन, तेल्हारा येथे सात, मुर्तिजापूर येथे मुर्तिजापूर येथे पाच, अकोला आयएमए
येथे 13, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 18, हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर
अकोट येथे 32 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 25
चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. अशा एकूण 105 चाचण्यांमधून
सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 297 चाचण्या
झाल्या पैकी 2116 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा