426 अहवाल प्राप्त, 65 पॉझिटीव्ह, 108 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

 


अकोला,दि.11 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 426 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 361 अहवाल निगेटीव्ह तर 65 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. आज एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान 108 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 12061(9776+2108+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 87590 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 85758 फेरतपासणीचे 353 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1479 नमुने होते. आजपर्यंत एकूण 87434 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 77658    आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

65 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 426 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 65 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 26 महिला व 39 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील  गोरक्षण रोड येथील आठ,  मुर्तिजापूर येथील सहा, अकोट येथील पाच, मोठी उमरी, न्यु तापडीया नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन, बार्शीटाकळी, कौलखेड, बाळापूर, पातूर, सिंधी कॅम्प, आयडीबीआय बँकसमोर, गड्डम प्लॉट व बाळापूर नाका येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मांजरी, आदर्श कॉलनी, गोकूल नगर, जीएमसी हॉस्टेल, जीएमसी कर्मचारी, डाबकी रोड, जठारपेठ, कुंभारी, म्हातोडी, गुरुदेव नगर, अंबिका नगर, हिवरखेड, मलकापूर, गीता नगर, माना, कुरुम ता.मुर्तिजापूर, कांजरा ता.मुर्तिजापूर, परिवार कॉलनी, रणपिसे नगर, जीएमसी व अडगाव खुर्द ता. अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.10) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

108 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 13, ओझोन हॉस्पीटल येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक तर होम आयसोलेशन येथून 83 असे एकूण 108 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज दुपारनंतर अडगाव बु. हिवरखेड ता. तेल्हारा  येथील रहिवासी असलेल्या 68  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि.7 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

680 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12061(9776+2108+177) आहे. त्यातील 342 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11039 आहे. तर सद्यस्थितीत 680 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ