जात वैधता प्रमाणपत्राची फेर पडताळणी तातडीने करा
अकोला,दि.3
(जिमाका)- सन
2011-12 मधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक विषयक दिलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची
फेर पडताळणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेशीत केले होते. त्यानुसार यादीमधील
27 अर्जदारांना पत्र देवूनही प्रतिसाद दिलेला
नाही अशा उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला यांचेकडे
मुळ जात वैधता प्रमाणपत्रासह इतर जाती विषयक आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची
पुर्तता एक संच छायांकित प्रतीसह आठ दिवसांचे आत करणेबाबत सूचित करण्यात येत आहे. त्याबाबत
अर्जदाराचे नावे पडताळणी कार्यालयात लावण्यात आली आहेत. अर्जदारांनी मुदतीत पुर्तता न केल्यास संबंधीत
अर्जदारांचे प्रकरण गुणवत्ता खुली ठेवुन नस्तीबद्ध करण्यात येईल तसेच जात वैधता
प्रमाणपत्रांचा वापर भविष्यात करता येणार नाही, तसे केल्यास मागास वर्ग व विशेष
प्रवर्ग अधिनियमानुसार कार्यवाहीसह शिक्षेस पात्र राहील असे जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा