अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

            अकोला,दि. 17 (जिमाका)- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजना बेरोजगार उमेदवारांसाठी उपलब्ध असून गरजू उमेदवारांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी महामंडळाकडून व्याजाचा परतावा या योजनेंतर्गत अर्थसहाय्य दिले जाते. बेरोजगार उमेदवारांनी  www.udyog.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर LOI (Letter of Intent) जनरेट होतो. बॅंकेने संबंधित उमेदवाराचे कर्ज प्रस्तावाला मान्यता दिल्यास महामंडळातर्फे व्याजाची रक्कम उमेदवारांच्या बचत खात्यात परत करण्यात येते. महामंडळाची ही योजना मराठा तसेच ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही त्या प्रवर्गांसाठीच आहे. यासाठी संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन आणि पूर्णपणे पारदर्शक आहे. या योजनेचा फायदा थेट लाभार्थ्यांना देण्यात येतो. ही योजना लोकाभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत सर्व माहिती वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही, तोपर्यंत व्याज परताव्याची पुढील कार्यवाही करता येत नाही.

लाभ घेण्याची कार्यपद्धती

       लाभार्थ्यांनी  ऑनलाईन माहिती भरताना पात्रता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा(रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशनकार्ड, गॅस बिल किंवा बँक पास बुक यापैकी कोणताही एक पुरावा), उत्पन्नाचा पुरावा (तहसीलदार ह्यांचा उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जर लग्न झाले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला‍ किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पोर्टलवरील एकपानी प्रकल्प अहवाल अशी  कागदपत्रे आवश्यक राहील.

            लाभार्थ्यांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर उमेदवाराला व्याज परतावा प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर कर्ज प्रकरणासोबत प्रमाणपत्र बँकेला स्वत: जावून सादर करावे व त्याची पोच घ्यावी. बँक मंजुरीनंतर उमेदवाराने स्वत: वेब प्रणालीत माहिती अद्ययावत केली आहे काय, याची खात्री करावी. मंजुरीनंतर बँकेने आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याला द्यावीत. बँकेमध्ये पूर्ण हप्ता भरल्यानंतर महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम करावा. पडताळणी केल्यानंतर महामंडळामार्फत व्याज परतावा करण्यात येईल.

           लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहाय्यक आयुक्त प्रांजली यो. बारस्कर कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी  सुधाकर झळके यांनी केले आहे. योजनेविषयी इतर माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ