शेतकरी गटामार्फत ग्राहकापर्यंत थेट घरपोच भाजीपाला व धान्य विक्री
अकोला,दि.23(जिमाका)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) अंतर्गत शेतकरी गटामार्फत उत्पादीत केलेल्या भाजीपाला, फळे तसेच धान्य, हळद पावडर व कडधान्य शहरातील ग्राहकापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी यांनी आत्माच्या माध्यमातून शहरातील मोक्यांच्या ठिकाणी तसेच घरपोच भाजी व धान्य पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी यांनी याकरीता
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थाक(आत्मा), मंडल कृषि अधिकारी, कृषि परिवेक्षक, कृषी सहायक,
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक(आत्मा) यांच्याशी संपर्क साधाण्याचे आवाहन प्रकल्प संचालक
आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. कांतापा खोत यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा