पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

 अकोला,दि.१६ (जिमाका)- भारतीय हवामान विज्ञान संस्थेच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार अकोला जिल्ह्यात दि.१६ ते १८  दरम्यान  हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मेघ गर्जना व विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता  वर्तवलेली आहे. तरी याबाबत गावपातळीवरील  नागरिकांना आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी  मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य कर्मचारी या साऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबावे व दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले