‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन

 

             अकोला,दि.26जिमाका)- जिल्हयातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेकरीता सुचना -

            रांगोळी स्पर्धेकरीता प्रत्येक तालुक्यातुन प्रथम बक्षीस तीन हजार रुपये, व्दितीय दोन हजार रुपये व तृतीय पुरस्कार एक हजार रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.  या करिता तालुका आरोग्य अधिकारी व बालविकास प्रकल्प्‍ अधिकारी संयुक्तपणे हा उपक्रम राबविणार आहेत.

            शार्ट फिल्म (Short Film/Documentary) स्पर्धेकरीता जिल्हातून तीन पुरस्कार देण्यात येतील. त्याकरिता बक्षिसाची रक्क्म प्रथम बक्षीस पाच हजार रुपये, व्दितीय चार हजार रुपये तर तृतीय पुरस्कार तीन हजार रुपये असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहे.  शार्ट फिल्मकरिता तीन मिनिटांची मर्यादा देण्यात आली आहे. स्पर्धेकरिता मुलीच्या जन्माचे स्वागत, स्त्री शिक्षणाची गरज, मुलींकरिता असलेल्या शासकिय योजना, बेटी बचाव देश बचाव, मेरी बेटी मेरा अभिमान तसेच मुली व महिला सक्षमीकरणकरिता राबविलेले उपक्रमांची यशोगाथा हे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. स्पर्धेमध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सुपरवायझर, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच स्वयंसेवी संस्था व इतर संबंधित सहभागी हो शकतील. शार्ट फिल्म संबंधितांनी परस्पर महिला बाल कल्याण कार्यालयास दि. 4 मार्चपर्यंत पेनड्राईव्हव्दारे सादर करावी. स्पर्धेक अकोला जिल्हात कार्यरत असावा. शार्ट फिल्म दि.26 फेब्रुवारी  ते दि. 4 मार्च 2021 या कालावधीत dhoako@rediffmail.com  akolaicds@gmail.com ईमेल व दुरध्वनी क्रमांक 0724-2435075, मो.नं. 9881743407 या वॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात याव्या. या स्पर्धेमध्ये सर्वांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महिला बालकल्याण सभापती सौ मनिषा सुशांत बोर्डेमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले