रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 41 चाचण्यात तीन पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 11(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 41 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात तेल्हारा येथे पाच, मुर्तिजापूर येथे नऊ, आयएमए अकोला येथे सात, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 14 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर बार्शीटाकळी येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,  हेडगेवार लॅब येथे तीन जणांच्या चाचण्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आले. असे  एकूण 41 चाचण्यांमधून तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 704  चाचण्या झाल्या पैकी 2164 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले