244 अहवाल प्राप्त, 20 पॉझिटीव्ह, 22 डिस्चार्ज

 


अकोला,दि.4 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 244 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 224 अहवाल निगेटीव्ह तर 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. 22 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.3) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11707(9474+2056+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 85596 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 83798 फेरतपासणीचे 343  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1455 नमुने होते. आजपर्यंत एकूण 85392 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 75918 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

20 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  आज सकाळी 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील तीन, खडकी, संतोष नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित गोरक्षण रोड, जुने शहर, गोडबोले प्लॉट, आझाद कॉलनी, निंभोरा, गंगानगर, सिंधी कॅम्प, शासकीय क्वॉटर, कीर्ती नगर, कृषी नगर व कपिलवास्तू येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.3) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,कृपया याची नोंद घ्यावी.

22 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन, स्कायलार्क हॉटेल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन,  तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 11, अशा एकूण 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

714 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11707(9474+2056+177)आहे. त्यातील 338 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10655 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 714 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना