तापाचे रुग्ण कोविड चाचणीसाठी पाठवा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 




 अकोला,दि.१९(जिमाका)- जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या तापाचे वा कोविड लक्षणे दिसणारे रुग्ण हे तातडीने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे खाजगी डॉक्टर्सना दिले.

यासंदर्भात आज जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलिस अधिक्षक जी. श्रीधर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रभारी  मनपा आयुक्त पंकज जावळेकर,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर्सच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या रुग्णालयात आलेला रुग्ण हा ताप, सर्दी , खोकला यासारख्या कोविड लक्षणांनी  युक्त असेल तर त्यास तातडीने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी संदर्भित करावे. यासंदर्भात प्रशासनाने फिरते पथक तयार केले आहे. रुग्णांचे सिटी स्कॅन करुन घेऊन परस्पर रेमडीसेव्हियरचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास  संबंधित डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ