492 अहवाल प्राप्त, 159 पॉझिटीव्ह, 99 डिस्चार्ज

 


अकोला,दि.16 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 492 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 333 अहवाल निगेटीव्ह तर 159 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 99 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.15) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12664(10311+2176+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 89625 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 87657 फेरतपासणीचे 360 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1608 नमुने होते. आजपर्यंत एकूण 89432 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 79121       आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

159 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 492  जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 154 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 59 महिला व 95 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील 29, अकोट येथील 14, गीता नगर, तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, रवी नगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी पाच, जीएमसी व डोंगरगाव येथील प्रत्येकी चार, मोठी उमरी, लक्ष्मी नगर, जीएमसी हॉस्टेल व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, अमानखाँ प्लॉट, जूने शहर, बाळापूर, पानीपत चौक, पिकेव्ही क्वॉटर, तोष्णीवाल लेआऊट, जठारपेठ, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित बॉय हॉस्टेल,सिंधी कॅम्प, खदान, कॉग्रेस नगर, गोकूल कॉलनी, उमरी, घुसर, शिव नगर, मलकापूर,  वनी रंभापूर, यात्रा चौक,दिनोडा, दाना बाजार, बाळापूर नाका, रमेश नगर, शंकर नगर, सिराज पार्क, गुरुकृष्णा कॉलनी, अडगाव ता.तेल्हारा, सिंधी कॅम्प, किर्ती नगर, राम नगर, हरीहर पेठ, आळसी प्लॉट, शिवनेर कॉलनी, दुर्गा चौक, गुलजारपुरा, टॉवर चौक, वृदावन नगर, टेलीफोन कॉलनी, बार्शीटाकळी, केशव नगर, हिंगणा रोड, किर्ती नगर, रामदासपेठ, मलकापूर, सातव चौक, राजकमल टॉकीज, मराठा नगर, केला प्लॉट, राहटे नगर, दत्त कॉलनी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात चार महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यात जिएमसी येथील तीन तर गुलशन कॉलनी येथील दोन याप्रमाणे  रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.15) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 24 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

99 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 32, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच,  बिहाडे हॉस्पीटल येथून सात, स्कायलार्क हॉटेल येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 51 अशा एकूण 99 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

1031 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12664(10311+2176+177) आहे. त्यातील 344 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11289 आहे. तर सद्यस्थितीत 1031 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ