सहाय्यक कामगार विभागामार्फत 22 ते 28 फेब्रुवारी कालावधीत जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 


 

अकोला,दि. 23(जिमाका)- सहाय्यक कामगार आयुक्त विभागामार्फत दि. 22 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत किमान वेतन अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणीकरीता जनजागृती सप्ताह आयोजीत करण्यात आले आहे.

किमान वेतन अधिनियमानुसार विविध आस्थापना दुकाने, हॉटेल्स, कारखाने, विविध उद्योग व इतर व्यापारी संस्था अंतर्गत एकूण 67 अनुसूचित उद्योगातील कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित केलेले आहेत. त्यानुसार कामगारास किमान वेतन धनादेश किवा बँकेमार्फत देणे बंधनकारक आहे. तसेच कार्यस्थळी हजेरी रजीस्टर ठेवणे बंधनकारक आहे. सर्व संबंधितांनी किमान वेतनानुसार कामगारांना वेतन अदा करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीकरीता ई-मेल aclakolamaharashtra@gmail.com  किवा 0724-2429289 दुरध्वनी क्रमांकावर सहाय्यक कामगार आयुक्त, गोरक्षण रोड, अकोला येथे संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ