1637 अहवाल प्राप्त, 340 पॉझिटिव्ह, 106 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू


अकोला,दि.24(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1637 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1297 अहवाल निगेटीव्ह तर 340 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 106  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन  रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 45 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 14803(12188+2438+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 96819 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 94660 फेरतपासणीचे 372 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1787 नमुने होते. आजपर्यंत एकूण 96728 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 84540      आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

340 पॉझिटिव्ह

  आज सकाळी 234 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 104 महिला व 130 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील 49, एमआयडीसी व मुर्तिजापूर येथील 14, डाबकी रोड येथील 11, जीएमसी येथील 10, केशव नगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेश नगर येथील प्रत्येकी चार, सोपीनाथनगर, दुर्गा चौक, गड्डम प्लॉट, सिंधी कॅम्प, रजपूतपुरा, महाकाली नगर, बाळापूर रोड, अंबुजा, व्हीएचबी कॉलनी व गायगाव येथील प्रत्येकी तीन, गोरेगाव खु., तेल्हारा, बलवंत कॉलनी, राऊतवाडी, शिवाजी नगर, उन्नती नगर, खोलेश्वर, गंगा नगर, खडकी व रिधोरा येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित पास्टूल, कान्हेरी सरप, शिवाजी प्लॉट, इनकम टॅक्स, कलेक्टर ऑफीस, कपीलवास्तू नगर, कलाल चाळ, बार्शीटाकळी, पुनोती ता.बार्शीटाकळी, कारला ता. तेल्हारा, शिवसेना वसाहत, गीता नगर, देशमुख फैल, हिवरखेड, खोलेश्वर, गौरी अपार्टमेन्ट, सहकार नगर, गौरव नगर, जैन चौक, किर्ती नगर, उद्य नगर, कृषी नगर, बलोदे लेआऊट, गोडबोले प्लॉट, जूने शहर, गवलीपुरा, बाळापूर नाका, शास्त्री नगर, नयागाव, बिर्ला गेट, नांदखेड टाकळी, यात्रा रोड चौक, भातवाडी बु.चिचोली, म्हातोडी व गोरेगाव येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 106  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 45 महिला व 61  पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील 12, डाबकी रोड येथील सात, सिरसो येथील सहा, हिरपूर, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यु राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा, व वानखडे नगर येथील प्रत्येकी तीन, विधु नगर, आदर्श कॉलनी, किर्ती नगर, तापडीया नगर, रामनगर, गोरक्षण रोड, आश्रम नगर, मालीपुरा व खोलेश्वर येथील प्रत्येकी दोनतर उर्वरित बोर्टा, कोरडे हॉस्पीटल, अकोट, दिपक चौक, उमरी, शास्त्री नगर, गजानन पेठ, जूने शहर, गुडधी, रणपिसे नगर, खडकी, बालाजी नगर, अमाखाँ प्लॉट, गोडबोले प्लॉट, विजय नगर, देशमुख फैल, तिलक रोड, शासकीय वसाहत, रजपूतपुरा, अमप्रीत कॉलनी, गंगा नगर, गड्डम प्लॉट, सुधीर कॉलनी व गुलजार पुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 45 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 234, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 106 तर रॅपिड चाचण्यात 45 असे एकूण 385 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

 

106 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 18, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून चार, होम आयसोलेशन येथून 62 असे एकूण 106 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात वाशिंबा बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेल्या 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माना ता.मुर्तिजापूर येथील 73 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2663 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 14803(12188+2438+177) आहे. त्यातील 359 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11781 आहे. तर सद्यस्थितीत 2663 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले