स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा
अकोला,दि. 11
(जिमाका)- भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग
घेतलेले तसेच भारतीय लढ्यात मोलाचे योगदान दिलेले स्वातंत्र्य
सैनिक यांना तसेच भारत छोडो आंदोलन, हैद्राबाद मुक्ती
संग्राम तसेच गोवा व दादरा नगरहवेली मुक्ती संग्राम या स्वातंत्र्य संग्रामामध्ये
सहभाग घेऊन देशासाठी योगदान दिले आहे, अशा स्वातंत्र्य
सैनिकांना व त्यांच्या पश्चात स्वातंत्र्य सैनिक विधवा पत्नी यांना केंद्र व राज्य
शासनाकडून निवृत्तीवेतन दिले जात असल्याने सदयःस्थितीत हयात असलेल्या स्वातंत्र्य
सैनिक व विधवा पत्नी यांची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार
शासनास सादर करावयाची आहे. तसेच माहिती शासनास विहीत विवरणपत्रात सादर न
केल्यास शासनामार्फत संबंधित निवृत्तीवेतन बाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने
हयात असलेले व शासनामार्फत निवृत्तीवेतन घेत असलेले स्वातंत्र्य सैनिक तसेच
त्यांचे मृत्यु पश्चात निवृत्तीवेतन घेत असलेल्या त्यांच्या विधवा पत्नी यांची
माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार आवश्यक कागदपत्रासह आधार कार्ड, बँक पासबुक
(मागील ६ महिन्यांची पेन्शन प्राप्त झाल्याच्या प्रिंट सह), राशन कार्ड, स्वातंत्र्य
सैनिक सन्मानपत्र, स्वातंत्र्य
सैनिक ओळखपत्र, पि.पि.ओ.
क्रमांकासह जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नझारत शाखेत जमा करण्याचे आवाहन निवासी
उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा