फिरत्या केंद्राद्वारे स्वॅब संकलन; जिल्हाधिकारी पापळकर यांनी केली पाहणी

 अकोला,दि.6 (जिमाका)-कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी  जिल्ह्यात विशेष पथकाद्वारे स्वॅब संकलन करण्यात येत आहे. आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात फिरते स्वॅब संकलन केन्द्रास भेट देवून पाहणी केली. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात धुणे या नियमाचा पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.





रुग्ण संख्या वाढत असलेली २९ ठिकाणे जिल्हा प्रशासनाने निश्चित केली आहेत. अशा सर्व ठिकाणी हे फिरते केंद्र जाऊन लोकांचे घशातील स्त्रावांचे नमुने संकलन करणार आहेत, अशी माहितीही यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ