रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 325 चाचण्यात 54 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 21(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 325 चाचण्या झाल्या त्यात 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली..
आज दिवसभरात अकोट येथे 20 चाचण्या झाल्या त्यात सात
जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे 19 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले,
तेल्हारा येथे 84 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 102 चाचण्या
झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, पातूर येथे 11, आरोग्य कर्मचाऱ्याचे 19 चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 51 चाचण्या
झाल्या त्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे 19 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे एकूण 325 चाचण्यांमधून 54
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 981 चाचण्या झाल्या पैकी 2402 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा