कोरोना प्रतिबंधात्मक योजनेअंतर्गत 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत शिकाऊ अनुज्ञप्तीचे कामकाज बंद
अकोला,दि. 23(जिमाका)- कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये याकरीता उपाययोजनांचा एक भाग
म्हणून शिकाऊ अनुज्ञप्ती दि. 23 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत परिक्षेकरिता
उपस्थितीत राहण्याची तारिख व वेळ मिळालेल्या उमेदवारांनी या कालावधीत कार्यालयात
येवु नये. त्यांना उपस्थितीत राहण्याकरिता नंतर तारीख कळविण्यात येईल. दि. 23 ते
28 फेब्रुवारी पर्यतचे सर्व तालुकास्तरावर घेण्यात येणारे मासिक दौरे रद्द करण्यात
येत आहेत. तसेच स्वाक्षरी प्रमाणित करण्याकरिता होत असणारी गर्दी लक्षात घेता या कालावधीकरिता
हे कामकाज बंद ठेवण्यात येत आहे. तरी संबंधित कामकाजाकरिताच्या उमेदवारांनी,
व्यक्तींनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी
केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा