अकोला,दि. 4(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 88 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय
खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात अकोट
येथे तीन, तेल्हारा येथे 10, मुर्तिजापूर येथे एक, अकोला आयएमए येथे सात, आरोग्य
कर्मचाऱ्यांचे 26, हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 38 चाचण्या झाल्या त्यात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण 88 चाचण्यांमधून एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 192 चाचण्या झाल्या पैकी 2110 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा