अकोला,दि. 26(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 420 चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
आज दिवसभरात अकोट येथे 238 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बार्शीटाकळी येथे एक चाचणी झाली त्यात एकाचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 46 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 24 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून 62 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार येथे चार चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला येथे
एक, तेल्हारा येथे 40, अकोला आयएमए येथे चार चाचण्या झाल्या त्यात
कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे एकूण 420 चाचण्यांमधून 40
जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 35 हजार 349 चाचण्या झाल्या पैकी 2587 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा