संचारबंदीचा सक्तीने पालन करा




अकोला,दि. २२(जिमाका)- कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव शहरी व ग्रामीण भागात सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून संचारबंदीचा सक्तीने पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात  कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी  पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, दिनेश नैताम, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी सचिन कदम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख, आदि उपस्थित होते.

नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचे पालन करावे. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन अनावश्यक घराबाहेर न जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी  केले. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे त्या भागात संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढवावे. होम आसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारुण असे रुग्ण घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे, यासाठी पोलिस विभागाने विशेष पथक तयार करावे,  इत्यादी सूचना त्यांनी दिल्या.  नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ