284 अहवाल प्राप्त, 98 पॉझिटीव्ह, 48 डिस्चार्ज, एक मयत

 


अकोला,दि.14 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 284 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 184 अहवाल निगेटीव्ह तर 98 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. तर एकाचा खाजगी हॉस्पीटल येथे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान 48 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12395(10076+2142+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 88791 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 86836 फेरतपासणीचे 357 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1598 नमुने होते. आजपर्यंत एकूण 88757 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 78681      आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

98 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात  जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 91 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 28 महिला व 63 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तापडीया नगर, डाबकी रोड व शिवणी येथील प्रत्येकी चार, चर्तुरभुज कॉलनी, कारंजा राम ता.बाळापूर, विद्या नगर, जठारपेठ, मोठी उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, वानखडे नगर, गोरक्षण रोड, पातूर, खानापूर ता.पातूर, गोकूल कॉलनी, कैलाश टेकडी, मलकापूर, जवाहर नगर, शास्त्री नगर, गिता नगर, ज्योती नगर, जीएमसी, गोडबोले प्लॉट येथील दोन तर उर्वरित खेडकर नगर, खडकी, मनारखेड,हिंगणा फाटा, कलेक्टर ऑॅफीस, बोरगाव मंजू, ज्योती नगर, रणपिसे नगर, न्यु राधेश्याम प्लॉट, चोहट्टा बाजार, नंदीपेठ, संत नगर, गुलशन कॉलनी, पास्टूल, निंभोरा, आाळसी प्लॉट, शिवणी, दहीहांडा, न्यु तापडीया नगर, राम नगर, श्रीकृष्ण नगर, अंबिकापूर, वृंदावन नगर, म्हाडा कॉलनी, गणेश नगर, कौलखेड, लहान उमरी, तुकाराम चौक, लकडगंज, रामदासपेठ, अनिकेत चौक, रेल्वे कॉलनी, पिंजर, वाशिम रोड व त्र्यंबक नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.  तसेच आज सायंकाळी सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश असून ते  कौलखेड, राउतवाडी, विद्या नगर, बाळापूर, अमाणखा प्लॉट, बार्शीटाकली व अकोट येथील रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.13) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 15 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

48 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 12, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक,  तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 28 अशा एकूण 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथून एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण तापडीया नगर, अकोला येथील 85 वर्षीय पुरुषांचा उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांना 8 फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

912 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12395(10076+2142+177) आहे. त्यातील 343 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11140 आहे. तर सद्यस्थितीत 912 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ