287 अहवाल प्राप्त, 32 पॉझिटीव्ह, 11 डिस्चार्ज
अकोला,दि.6(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना
संसर्ग तपासणीचे 287 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 255
अहवाल निगेटीव्ह तर 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. 11 जणांना डिस्चार्ज
देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.5)
रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 11784(9544+2063+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 86086 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 84281 फेरतपासणीचे 344 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1461 नमुने होते.
आजपर्यंत एकूण 85990 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण
निगेटीव्ह अहवालांची संख्या 76446 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
32
पॉझिटीव्ह
आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज
सकाळी 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे.
त्यातील खदान, तेल्हारा, अकोट,
शिवपूर, कान्हेरी सरप व दुर्गा चौक येथील
प्रत्येकी दोन, तर उर्वरित राउतवाडी, खेतांन
नगर, श्रीवास्तव चौक, जेल क्वॉटर,
गुडधी, मराठा नगर, बार्शीटाकली,
जवाहर नगर, किर्ती नगर, लहान
उमरी, राम नगर, रतनलाल प्लॉट, वणी रंभापुर, मूर्तिजापूर, रणपिसे
नगर, डाबकी रोड, बाळापूर, जळगाव नहाटे ता. अकोट, वानखडे नगर व देशमुख फाईल
येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी
कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री (दि.5) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.
त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल
संख्येत करण्यात आला आहे, याची
नोंद घ्यावी.
11 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 11 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
773 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11784(9544+2063+177) आहे. त्यातील 338 जण मयत आहेत. डिस्चार्ज
दिलेल्या एकूण व्यक्तींची 10673 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 773 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत
आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा