रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 112 चाचण्यात 14 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 19(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 112 चाचण्या झाल्या त्यात 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयामार्फत देण्यात आली आहे.
आज दिवसभरात अकोट येथे 27 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे एक,
मुर्तिजापूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
अकोला आयएमए येथे 13 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह
आला, आरोग्य कर्मचाऱ्याचे 20 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल
पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 37 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, असे
एकूण 112 चाचण्यांमधून 14 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 505 चाचण्या झाल्या पैकी 2321 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा