कुरणखेड; सर्तक क्षेत्र घोषित
अकोला,दि.4 (जिमाका)- कुरणखेड येथील हूसेन खान मुमताज खान यांच्या 36 कुक्कुट पक्षांपैकी 14 पक्षी
मृतावस्थेत आढळले. त्याचप्रमाणे
कुरणखेड पशुवैद्यकीय दवाखानाच्या मागच्या परिसरात सात कावळे मृत आढळले असून त्या
मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा
पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत कुरणखेड येथील
हुसेन खन मुमताज खान यांच्या पसरातील कुक्कूट केंद्रबिंदु मानुन 10
कि.मी. त्रिज्या परिसर सतर्क
क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
सतर्कतेचा आदेश निर्गमित -
मौजे कुरणखेड येथील हुसेन मुमताज खान यांच्या पसरातील कुक्कूट केन्द्रबिंद मानूण
त्या क्षेत्रापासून आजूबाजूचा 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क
क्षेत्र व सर्वेक्षण झोन म्हणून जाहीर
करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने प्रभावी क्षेत्रातील
परिसरामध्ये दोन टक्के सोडियम हायड्रोक्साईड किवा पोटॅशियम परमॅगनेटने निर्जंतुकीकरण
करावे, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनी चेहऱ्यावर
मास्क लावणे तसेच हातामोजांचा वापर करणे अनिवार्य आहे. वापरण्यात आलेल्या मास्क तसेच
हातमोजांची योग्यप्रमाणे विल्हेवाट लावण्यात
यावी.
प्रभावित
क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मध्ये इतर कुठलेही पशु-पक्षी येणार नाही याची दक्षता घेण्यात
यावी, प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्रीफार्म मधील पक्षांसंबंधीच्या आवश्यक त्या सर्व
नोंदी अद्यावत व व्यवस्थीत
ठेवण्यात याव्यात, तसेच परिसरामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांनी खबरदारीचे उपाय व सर्वेक्षणाचे काम
त्वरीत सुरु करुन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेशात नमूद केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा