1300 अहवाल प्राप्त, 228 पॉझिटिव्ह, 47 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू


अकोला,दि.26जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1300 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1072 अहवाल निगेटीव्ह तर 228 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 47  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर एका   रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 15392(12695+2520+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 99505 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 97333 फेरतपासणीचे 373 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1799 नमुने होते. आजपर्यंत एकूण 99425 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 86730       आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

228 पॉझिटिव्ह

  आज सकाळी 91 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 40 महिला व 51 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जितापूर येथील 16, अकोलखेड येथील 10, एमआयडीसी येथील नऊ, अबोदा येथील सहा, जीएमसी, डाबकी रोड व रवीनगर येथील प्रत्येकी चारपत्रकार कॉलनी येथील तीन, कृष्णा हाईट्स, गोरक्षण रोड, पोही ता. मुर्तिजापूर, चिकली ता.मुर्तिजापूर, जूने शहर, कौलखेड, रामनगर, रजपूतपुरा, बोरगाव मंजू व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सिधीविनायक नगर, सांगलद, बाळापूर, सेंट्रल जेल, तुकाराम चौक, राधे नगर, स्वालंबीनगर,कॉग्रेस नगर, गोडबोले प्लॉट, खोलेश्वर,रणपिसे नगर, न्यु तापडीया नगर, आळसी प्लॉट, माणिक टाँकीज व पोलिस हेडक्वॉटर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 137 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 46 महिला व 91 पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील 30, गोरक्षण रोड येथील आठ, पारस येथील सात, मांजरी व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी सहा, उगवा येथील पाच, अनवी, मोठी उमरी, राम नगर, खडकी व कौलखेड येथील प्रत्येकी चार, कान्हेरी, कोलंबी, पलसो भदे, लहान उमरी, जठारपेठ व दुर्गा चौक येथील प्रत्येकी तीन, झुरळ बु., वाशीम बायपास, तापडीया नग व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित टाकळी खोजबळ, सावरा, देवडी, सागवी मोहड, श्यामाबाद, अकोला जहॉगीर, हरीहरपेठ, शिवनी, रजपूतपुरा, गोडबोले प्लॉट, आदर्श कॉलनी, देशमुख फैल, आळशी प्लॉट, सिंधी कॅम्प, खोलेश्वर,खानापूर ता.पातूर, गजानन पेठ, श्रावगी प्लॉट, कापसी रोड, ओझोन हॉस्पीटल जवळ, मलकापूर, जवाहर नगर, म्हातोडी, न्यु राधाकिसन प्लॉट, गायत्री नगर, मनकर्णा नगर, देवरामबाबा चाळ, सोमवार वेस व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 91, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 137 तर रॅपिड चाचण्यात 40 असे एकूण 268 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

47 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 28, स्कायलार्क येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन तर हॉटेल रिजेन्सी येथील पाच जणांना असे एकूण 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात तळेगाव ता. तेल्हारा येथीलहिवासी असलेल्या 68   वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 23 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

3141 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 15392(12695+2520+177) आहे. त्यातील 363 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11888 आहे. तर सद्यस्थितीत 3141 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले