छत्रपती शिवाजी महाराज जयंती; १०० व्यक्तिंना उपस्थित राहता येणार

 अकोला,दि.१८(जिमाका)- कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या  पार्श्वभुमिवर छत्रपती  शिवाजी  महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव दि.१९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सुचना काल (दि.१७) जारी केल्या होत्या. त्यात सुधारणा करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करण्याच्या कार्यक्रमाला १०० व्यक्तिंना सामाजिक अंतर राखून उपस्थित राहता येईल, असे शासनाने एका शुद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे,असे अपर जिल्हादंडाधिकारी मुकेश चव्हाण यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले