रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 91 चाचण्यात 12 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 10(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 91 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बाळापूर येथे एक, बार्शीटाकळी येथे
एक, आयएमए अकोला येथे
तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 16 चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर अकोट येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले. तेल्हारा येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या
त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हेडगेवार लॅब येथे पाच
जणांच्या चाचण्या होऊन दोन जणांचे अहवाल
पॉझिटिव्ह आले. असे एकूण 91 चाचण्यांमधून 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 663 चाचण्या झाल्या पैकी 2161
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा