रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 95 चाचण्यात आठ पॉझिटीव्ह
अकोला,दि. 8(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 95 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे आठ तर मुर्तिजापूर
येथे 10, आरोग्य कर्मचाऱ्यांचा 17 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही. तर अकोट येथे 12 चाचण्या झाल्या त्यात
तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आयएमए येथे 11 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 36 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण 95
चाचण्यांमधून आठ जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 466 चाचण्या झाल्या पैकी 2136 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा