352 अहवाल प्राप्त, 50 पॉझिटीव्ह, 122 डिस्चार्ज


अकोला,दि.10 (जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 352 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 302 अहवाल निगेटीव्ह तर 50 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 122 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11984(9711+2096+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 87074 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 85249 फेरतपासणीचे 351 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1474 नमुने होते. आजपर्यंत एकूण 87008 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 77297   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

50 पॉझिटीव्ह

आज दिवसभरात 352 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, गिता नगर, मुर्तिजापूर व जूने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, देशमुख फैल, खडकी व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित राऊतवाडी, रचना कॉलनी, गजानन नगर, मोठी उमरी, शिवनगर, खोलेश्वर, अकोट, मोरद ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, तापडीया नगर, दिपक चौक, केडीया प्लॉट, अंनत नगर, केशर वेताल ता.पातूर, सिंधी कॅम्प, न्यु तापडीया नगर, सिव्हील लाईन, भागवत वाडी, लहरीया नगर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोघांच्या अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष असून ते सीएस ऑफिस व जैन नगर डाबकी रोड येथील रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री (दि.9) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

122 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, सुर्याचंद्र हॉस्पीटल येथून सहा, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 104 अशा एकूण 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

712 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11984(9711+2096+177) आहे. त्यातील 341 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 10931 आहे. तर सद्यस्थितीत 712 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले