राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम: मनपा हद्दीतील खाजगी डॉक्टर, औषध विक्रेते, प्रयोगशाळांना क्षय रुग्णांची माहिती देणे बंधनकारक
अकोला,दि.१८ (जिमाका)- कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णाला क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास त्याची माहिती महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. तथापि अशी माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
या संदर्भात मनपाच्या क्षयरोग
अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५
पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याबाबत
आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिसुचनेनुसार क्षयरोगाचे
निदान करणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नोंदणी कृत प्रयोगशाळा; सर्व पॅथोलाजी, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा व रेडीओलॉजी सुविधा पुरविणारे केंद्र यांनी
नविन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची
माहिती (टिबी नोटीफिकेशन) तसेच खाजगी
औषध विक्रेते यांनी क्षयरोगावरील शेड्युल H 1
अॅण्टी टिबी ड्रग क्षयरोग प्रतिबंध औषधे विक्री केलेल्या रुग्णांसंबंधीची माहिती विहित
नमुन्यात दरमहा शहर क्षयरोग अधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे.
क्षयरोगाचा प्रसार
रोखणे व नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहीती आरोग्य
विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे लोक याबाबत आरोग्य विभागास माहिती देणार नाहीत
अशा संस्था किंवा व्यक्तींना क्षयरोगाचा
प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवुन
त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम २६९ व २७० च्या नुसार दंडात्मक
कारवाई करण्यात येईल.या कलमा अंर्तगत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन
वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे. तरी सर्व संबंधितांनी अकोला महानगरपालिका
हद्दीत दरमहा नोटीफाय होणाऱ्या क्षयरुग्णांची अद्यावत माहिती –
cto.drpl@gmail.com येथे
द्यावी. अथवा www.nikshay.in WDMA या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी शहर क्षयरोग अधिकारी, चिवचिव पुस्तक बाजाराच्या
मागे, मनपा अकोला येथे संपर्क करावा,असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख
शेख, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांनी केले आहे. यासंदर्भात १८००-११-६६६६ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क
साधता येईल,असे मनपा आरोग्य विभागाने
कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा