प्रतिबंधात्‍मक क्षेत्रात मर्यादित स्‍वरुपात, निर्बधांसह सुरु

 

अकोला,दि. २२(जिमाका)- शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्र व प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता उर्वरितशहरी व ग्रामीण भागाकरिता निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये अंशत: बदल करुन प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये मर्यादित स्वरुपात निर्बंधासह सुरु करण्याचे  आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज  निर्गमित केले.

सुधारित आदेश निर्गमित :

 खाद्यगृहे, रेस्‍टॉरेन्‍ट  हे  मंगळवार (दि.23) पासून  सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरु राहतील. तथापी अशा खाद्यगृह,  रेस्‍टॉरेंट मधील किचन व खाद्यगृहे यांना  फक्‍त घरपोच सेवा देण्‍याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील, दुध विक्री, दुधाचे घरपोच वितरण सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते सात यावेळेत अनुज्ञेय राहील, सर्व खाजगी व वैद्यकिय सेवा, पशुचिकित्‍सक सेवा, त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, सर्व रुग्‍णालय व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. व कोणतेही रुग्‍णालय बंद आधार घेवून रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकारणार नाही, औषधीची दुकाने जी 24 तास नियमितपणे  सुरु राहतील.

मे. वजीफदार अॅन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला  हे पेट्रोलपंप सकाळी आठ ते  दुपारी तीन या कालावधीत अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु राहतील, प्रत्‍येक तालुक्‍यामध्‍ये एक पेट्रोलपंप सुरु राहतील या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करावेत. दि २३ फेब्रुवारी ते दि. 1 मार्च  या संचारबंदीच्‍या  कालावधीत  संपन्न होणा-या पूर्वनियोजीत परिक्षा ह्या त्‍यांचे वेळापत्रकानुसार घेण्‍यात येतील.  तसेच  परिक्षार्थी यांना सदर कालावधीमध्‍ये परिक्षेचे  ओळखपत्र (Hall Ticket) व पालकांना त्‍यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील, कृषी सेवा केन्‍द्र व  कृषी निविष्‍ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगहेसकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरु राहतील, चिकन, मटन व मांस विक्रीची दुकाने, अंडी विक्रीची दुकाने सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरु राहतील.

आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले