खाजगी डॉक्टर, औषध विक्रेते, प्रयोगशाळांना क्षय रुग्णांची माहिती देणे बंधनकारक-जिल्हाधिकारी
अकोला,दि.१७ (जिमाका)- कोणत्याही खाजगी रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णाला क्षयरोगाची लक्षणे दिल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला;जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय अकोला येथे देणे बंधनकारक आहे. तथापि अशी माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी कळविले आहे.
या संदर्भात जिल्हा क्षयरोग
अधिकारी यांनी यांनी दिलेल्या
माहितीनुसार, सन २०२५ पर्यंत क्षयमुक्त भारत करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले
जात आहेत. याबाबत आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अधिसुचनेनुसार
क्षयरोगाचे निदान करणाऱ्या सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, नोंदणी कृत प्रयोगशाळा; सर्व पॅथोलाजी,
मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा व रेडीओलॉजी सुविधा पुरविणारे केंद्र
यांनी नविन निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची
माहिती (टिबी नोटीफिकेशन) तसेच खाजगी
औषध विक्रेते यांनी क्षयरोगावरील शेड्युल H 1
अॅण्टी टिबी ड्रग क्षयरोग प्रतिबंध विक्री केलेल्या रुग्णांसंबंधीची माहिती सर्वांनी
विहित नमुन्यात दरमहा जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे.
क्षयरोगाचा प्रसार
रोखणे व नियमित उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहीती आरोग्य
विभागाकडे नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जे लोक याबाबत आरोग्य विभागास माहिती देणार नाहीत
अशा संस्था किंवा व्यक्तींना क्षयरोगाचा
प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात येवुन
त्यांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता चे कलम २६९ व २७० च्या नुसार दंडात्मक
कारवाई करण्यात येईल.या कलमा अंर्तगत दोषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दोन
वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतुद आहे. तरी सर्व संबंधितांनी दरमहा नोटीफाय होणाऱ्या
क्षयरुग्णांची अद्यावत माहिती खालील पत्यावर किंवा ई-मेल आयडीवर किंवा 9657233165 या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर पाठवावी. याबाबत दिरंगाई झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्यात येईल, असे
कळविण्यात आले आहे.
क्षयरुग्णाची नोंदणी
करणाऱ्यास शासना मार्फत प्रती रुग्ण पाचशे रुपये या प्रमाणे मानधन दिले जाणार आहे.
हीमाहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय,
आरोग्य भवन , लेडी हार्डिेग कंपाऊंड ,अकोला येथे तसेच ई-मेल –dtomhakl@rntcp.org येथे पाठवावी,असे आवाहन जिल्हा
क्षयरोग अधिकारी अकोला यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पीपीएम समन्वयक -
वसंत उन्हाळे, मो.9657233165 यांचेशी संपर्क साधावा,असेही
कळविण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा