अकोला मनपा, मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश 8 मार्चपर्यंत कायम- जिल्हाधिकारी

 

अकोला,दि. 27(जिमाका)- कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अकोला महानगरपालिका आणि मुर्तिजापूर व अकोट नगर परिषदेचे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्रात सोमवार दि. 1 मार्चपर्यंत घोषित करण्यात आले होते. या प्रतिबंधात्मक आदेशाला सोमवार दि. 1 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  निर्गमित केले.

 हे आदेश सोमवार दि. 1 मार्चच्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. 8 मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील, असेही आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू:

या आदेशात नमुद केल्यानुसार, घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची बिगर आवश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची  शासकीय कार्यालये आणि बँका(अत्यावश्यक सेवतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC. अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K.. महानगरपालीका, बँकसेवा वगळून) १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरीता जवळपास असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. ग्राहकांनी शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता पंचवीस व्यक्तींना(वधू व वरासह) तहसिलदारांकडुन परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय (विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.

मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पूर्वपरवानगी घेऊन परवानगी राहील.

भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील. मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.

प्रतिबंधात्‍मक क्षेत्रात मर्यादीत स्‍वरुपात निर्बंधासह सुरु

खाद्यगृहे , रेस्‍टॉरेन्‍ट  यांचे  किचन, स्‍वयंपाकगृह  हे  सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरु राहतील, तसेच अशा खाद्यगृह, रेस्‍टॉरेंट यांना  फक्‍त घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील, दुध विक्री, दुधाचे घरपोच वितरण सकाळी सहा ते आठ व सायं. पाच ते सायं. सातपर्यंत अनुज्ञेय राहील, सर्व खाजगी व वैद्यकिय सेवा, पशुचिकित्‍सक सेवा, त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, सर्व रुग्‍णालय व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील. व कोणतेही रुग्‍णालय बंद आधार घेवून रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकारणार नाही, औषधीची दुकाने मेडीकल हे नियमीतप्रमाणे सुरु राहतील.

सर्व पेट्रोल पंप हे सकाळी आठ ते दुपारी तीन या कालावधीत सुरु राहतील, तर मे. वजीफदार अॅन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अॅन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अॅटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील,  मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला  हे पाच पेट्रोलपंप सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु राहतील. या पाच पेट्रोलपंपाना दुपारी तीन ते रात्री आठ या कालावधीत अत्‍यावश्‍यक सेवा वगळता अन्‍य कारणाकरीता विक्री प्रतिबंधीत राहील, अकोट व मुर्तिजापुर नगर परिषद क्षेत्रामध्‍ये एक-एक पेट्रोलपंप सुरु राहतील या बाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्‍वतंत्र आदेश निर्गमित करतील,

दि. 8 मार्च पर्यंतच्‍या  प्रतिबंधीत कालावधीत  संपन्न होणाऱ्या पूर्वनियोजीत परिक्षा ह्या त्‍यांचे वेळापत्रकानुसार घेण्‍यात येतील.  तसेच  परिक्षार्थी यांना सदर कालावधीमध्‍ये परिक्षेचे  ओळखपत्र (Hall Ticket) व पालकांना त्‍यांचे ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य राहील, कृषी सेवा केन्‍द्र व  कृषी निविष्‍ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योगहे  सकाळी आठ  ते तीन वाजेपर्यंत सुरु राहतील, चिकन, मटन व मांस विक्रीची दुकाने, अंडी विक्रीची दुकाने सकाळी  आठ  ते तीन वाजेपर्यंत सुरु राहतील.

हे प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठीचे आदेश मंगळवार दि. 26 फेब्रुवारीच्या सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दि. 8 मार्च २०२१ च्या सकाळी आठवाजेपर्यंत लागू राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्यावर व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ