1186 अहवाल प्राप्त, 250 पॉझिटिव्ह, 44 डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

अकोला,दि.23(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1186 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 936 अहवाल निगेटीव्ह तर 250 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 44  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन  रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 14418(11848+2393+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 95271 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 93112 फेरतपासणीचे 372 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1787 नमुने होते. आजपर्यंत एकूण 95086 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 83238     आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

250 पॉझिटिव्ह

आज सकाळी 129 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 43 महिला व 86 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील 18, बाबुळगाव येथील 16, लोहारा येथील 13, गोरक्षण रोड येथील 11, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी पाच, बाळापूर व कंजरा येथील प्रत्येकी चार, मलकापूर, खिरपूरी बु. व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन, अयोध्या नगर, तापडीया नगर, दातवी, सहकार नगर, कौलखेड व कोठारी बु. येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गणेशनगर, खदान, कलेक्टर ऑफिस, केशव नगर, खडकी, हिंगणा रोड, जीएमसी हॉस्टेल, केळीवेळी, सातव चौक, जूने शहर, रणपिसे नगर, रामदासपेठ, दुर्गा चौक, गाडगे नगर, सिंधी कॅम्प, जठारपेठ, वडद, बोरगाव मंजू, मनारखेड, आगर, पातूर, हिंगणा उमरा, पिंपरी अडगाव, सुधीर कॉलनी, बीअँडसी क्वॉटर, पाचगणी ता.पातूर, मोठी उमरी, अकबर प्लॉट, निभोंरा, बार्शीटाकळी, बोरगाव वैराळे व दहिहांडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी  121 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 29 महिला व 92 पुरुषांचा समावेश आहे. घुसर येथील 14, डाबकी रोड व अकोट येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ व  पिंजर येथील प्रत्येकी पाच, रतनलाल प्लॉट, कौलखेड, बार्शीटाकळी व दुर्गा चौक येथील प्रत्येकी चार, सुधीर कॉलनी, शास्त्री नगर, मलकापूर व खोलेश्वर येथील प्रत्येकी तीन, केशव नगर, रणपिसे नगर, टॉवर चौक, पत्रकार कॉलनी, ओझोन हॉस्पीटल जवळ, गिता नगर, शिवाजी नगर, मोठी उमरी, गोरक्षण रोड, झोडगा ता.बार्शीटाकळी, पिंपंळखुटा, न्यु तापडीया नगर व किर्ती नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अग्रसेन नगर, अंबीका नगर, रजपूतपुरा, गंगा नगर, जामोदे लेआऊट, कापशी, स्वावलंबी नगर, भागवतवाडी, बाबुळगाव जहॉ., आदर्श कॉलनी, गड्डम प्लॉट, टेलीफोन कॉलनी, सातव चौक, बिर्ला कॉलनी, जवाहर नगर, संतोष नगर, लहान उमरी, चर्तुभूज कॉलनी, रामदासपेठ, राम नगर, निंबी ता.बार्शीटाकळी, चोहेगाव ता.बार्शीटाकळीहातोली ता.बार्शीटाकळी, राजनखेड ता.बार्शीटाकळी, गायत्री नगर, काँग्रेस नगर, सिंधी कॅम्प, पोलिस हेडक्वॉटर, हिवरखेड, कान्हेरी गवली व तापडीया नगर  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

44 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 22, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून दोन, अवघाते हॉस्पीटल येथून सात, असे एकूण 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात सिद्धार्थवाडी, नायगाव अकोला येथील रहिवासी असलेल्या 61  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 18 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य माऊलीनगर, खडकी येथील 74 वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 22 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती सकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2386 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 14418(11848+2393+177) आहे. त्यातील 357 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11675 आहे. तर सद्यस्थितीत 2386 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ