रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 166 चाचण्यात 40 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 17(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.16) दिवसभरात झालेल्या 166 चाचण्या झाल्या त्यात 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोला आयएमए येथे 10, आरोग्य कर्मचाऱ्याचे 47  चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट येथे 39 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 62 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे  एकूण 166 चाचण्यांमधून 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 279  चाचण्या झाल्या पैकी 2283 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले