आधारभूत किंमत खरेदी योजना हरभरा पिकाची नोंदणी करण्याचे आवाहन

 

            अकोला,दि. १७ (जिमाका)- महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाअंतर्गत रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत चना (हरभरा) खरेदी होणार आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून खरेदी करावयाच्या हरभरा पिकाची ऑनलाईन नोंदणी  सोमवार दि.१५ पासून सुरु झाली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर चना नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी केले आहे. चना नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सातबारा उतारा(उताऱ्यात २०२०-२१ च्या चना पिक पेऱ्याची नोंद आवश्यक आहे), आधारकार्ड व आधारलिंक असलेल्या  बॅंक पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक राहिल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ