रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 198 चाचण्यात 45 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 24(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.23) दिवसभरात झालेल्या 198 चाचण्या झाल्या त्यात 45 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली.
आज दिवसभरात बार्शीटाकळी येथे आठ
चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला,
तेल्हारा येथे 34 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे
अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 10 चाचण्या
झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला
आयएमए येथे 15 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा
अहवाल पॉझिटिव्ह आला, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 24 चाचण्या
झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून 83 चाचण्या झाल्या त्यात 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हेगडेवार येथे 10 चाचण्या
झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अकोट
येथे 14 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,
असे एकूण 198 चाचण्यांमधून 45 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 34 हजार 724 चाचण्या झाल्या पैकी 2505 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा