जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा



अकोला,दि. २१(जिमाका)- कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज अमरावती विभागासाठी आदेश जारी केले. त्यात संसर्ग जास्त असलेल्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करुन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी सचिन कदम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी फारुख शेख तसेच सर्व झोनल अधिकारी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले की, संपूर्ण अकोला महानगरपालिका क्षेत्र तसेच अकोट व मुर्तिजापूर नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषीत करण्यात आले असून याठिकाणी करावयाच्या उपाययोजना अंमलात आणाव्या. त्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आहे त्या भागात बॅरेकेटींग करणे, होम आसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारणे, असे रुग्ण घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रातील परवानगी व्यतीरिक्त जी दुकाने व आस्थापना सुरु असतील त्यांच्यावर कारवाई करणे, इत्यादी सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय प्रतिबंधात्मक क्षेत्रात रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात नमूने संकलनासाठी विशेष उपाययोजना राबवणे व अधिकाधिक लोकांच्या चाचण्या करुन घेणे, असे निर्देश त्यांनी दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले