६६२ अहवाल प्राप्त, १७३ पॉझिटिव्ह, ७५ डिस्चार्ज, चौघांचा मृत्यू
अकोला,दि.२०(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ६६२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४८९ अहवाल निगेटीव्ह तर १७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल
(दि.१९) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २७ जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १३५९३(१११३५+२२८१+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ९२३३९ नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे ९०२१० फेरतपासणीचे ३६७ तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे १७६२ नमुने होते. आजपर्यंत
एकूण ९२२२४ अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८१०८९ आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
१७३ पॉझिटिव्ह
आज सकाळी १७३ जणांचे अहवाल
पॉझिटीव्ह आले. त्यात ७१ महिला व १०२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर
येथील २३, जीएमसी येथील १२, कौलखेड
येथील १०, डाबकी रोड येथील नऊ, विरवाडा
ता.मुर्तिजापूर येथील आठ, भारती प्लॉट, गोरक्षण रोड व जठारपेठ येथील
प्रत्येकी सहा, दगडी पुल, खडकी व
लखनवाडा येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ येथील चार, मलकापूर येथील तीन, व्हीबीएच कॉलनी,तुकाराम चौक, खडकी, धोगा,
मोठी उमरी, जवाहर नगर, गायगाव,
सूधीर कॉलनी, घुसर, मनकर्णा
प्लॉट, गड्डम प्लॉट व खदान येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित
व्यकटेश नगर, कोठारी नगर, अशोक नगर,
कलमेश्वर, रजपुतपूरा, पोलिस
हेडक्वॉटर, अकोट फैल, स्वराज्य भवन,
कान्हेरी सरप, जीएमसी हॉस्टेल, तापडीया नगर, नवरंग सोसायटी, गंगाधर
प्लॉट, किर्ती नगर, न्यु राधाकिसन
प्लॉट, कॉग्रेस नगर, गंगा नगर, तोष्णीवाल लेआऊट, बोरगाव मंजू, रवी नगर, विद्या नगर, अपोती,
खोलेश्वर, वानखडे नगर, आश्रय
नगर, केडीया प्लॉट, देवरावबाबा चाळ,
शिवनगर, हाजी नगर, हरिहर
पेठ, रतनलाल प्लॉट, पवन वाटीका,
अकोली, जूने शहर, उमरी,
मोरेश्वर कॉलनी, डोंगरगाव, गीता नगर, हिवरखेड, शिवाजी नगर,
कोठारी वाटीका, एसबीआय कॉलनी, दहिहांडा, गायत्री नगर, शास्त्री
नगर, पिंजर व पार्वती नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे
रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री रॅपिड
ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात २७ जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह
पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद
घ्यावी.
७५ जणांना
डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून १४, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, बिहाडे हॉस्पीटल येथून सात,
अवघाते हॉस्पीटल येथून पाच, स्कायलार्क हॉटेल
येथून तीन, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून सात, तर होम आयसोलेशन येथून ३४ अशा
एकूण ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
चार जणांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात चार जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यात सकाळी मृत्यू पावलेली एक महिला ही खदान परिसरातील कृषी नगर येथील ३० वर्षीय महिला असून
तिला दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते तर अन्य महिला ही विजय हाऊसिंग कॉलनी
येथील ७३ वर्षीय महिला असून त्यांना दि.९ रोजी दाखल करण्यात आले होते. तर सायंकाळी अकोट
येथील ८० वर्षीय महिला दगावली, या महिलेस दि. १९ रोजी दाखल केले होते. तर अन्य मयत
निंबा ता. मूर्तिजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष असून त्यांस दि. १७ रोजी दाखल करण्यात
आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
१७४५ जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची
संख्या १३५९३(१११३५+२२८१+१७७)आहे. त्यातील ३५२ जण मयत आहेत.
डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या ११४९६ आहे. तर
सद्यस्थितीत १७४५ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार
घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या
सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा