७५४ अहवाल प्राप्त, २४२ पॉझिटिव्ह, ३७ डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

 अकोला,दि.१९(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ७५४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५१२  अहवाल निगेटीव्ह तर २४२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ३७ जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  १३३९३ (१०९६२+२२५४+१७७)   झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ९१७३१ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ८९६२० फेरतपासणीचे ३६३ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १७४८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९१५६२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८०६००   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

२४२ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ७५४ अहवाल प्राप्त झाले.  त्यात आज सकाळी १५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६० महिला व ९७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २२, अकोट येथील १३, मनकर्णा येथील आठ, सिंधी कॅम्प येथील सात, डाबकी रोड व तापडीया नगर येथील प्रत्येकी सहा, खदान पोलिस स्टेशन येथील पाच, पातूर, खडकी, गोरक्षण रोड, कौलखेड, जठारपेठ,जीएमसी व न्यु शिवाजी नगर येथील प्रत्येकी चार,  उमरी, बाळापूर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, पोलिस हेडक्वॉटर,गीता नगर, रणपिसे नगर, मलकापूर, हरिहर पेठ, विद्यानगर, लक्ष्मी नगर, वनी वेताल ता.अकोट व मलानी वाटीका येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित कान्हेरी गवळी, हनवाडी, न्यु जैन टेम्पल, गीरी नगर, तुकाराम चौक, रजपूतपुरा, येवदा, लक्ष्मी अर्पाटमेन्ट, बाभुळगाव, इम्ब्राड कॉलनी, वाशिम रोड, शिवनी खदान, मित्रनगर, देशमुख फैल, राम नगर, केशवन नगर, हिंगणा रोड, गजानन पेठ, न्यु गोयका लेआऊट, न्यु पोदार स्कूल,मोठी उमरी, कॉग्रेस नगर, मो.अली रोड, वृंदावन नगर, बेलोदे लेआऊट, घुसर,  जूने शहर, राऊतवाडी, उमरी, सुकली ता.अकोट, मोरेश्वर कॉलनी, आरोग्य नगर, यमूना तरंग, जीएमसी हॉस्टेल व नवे गाव येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे.

 तर आज सायंकाळी ८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ३४ महिला  व ५१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील आठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी चार, गोरक्षण रोड, कौलखेड व माधव नगर येथील प्रत्येकी तीन जण, गड्डम प्लॉट,  वाशीम बायपास,  कॉग्रेस नगर, जलतारे प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  रिंगरोड, मोमिनपुरा,  मोरेश्वर कॉलनी, तुकाराम चौक,  बायपास रोड,  मोहारी, सातव चौक,  रतनलाल प्लॉट,  मनकर्णा प्लॉट,  कास्तकार भवन,  रजपुतपुरा,  रेणुकानगर, लहान उमरी, अमान खॉ प्लॉट, लक्ष्मी नगर, मोठी उमरी,  उमरी नाका,  चेलका ता. बार्शी टाकळी,  आनंद नगर, डाबकी रोड,  चोहोट्टाबाजार,  सिंधी कॅम्प, कीर्ती नगर, जुने शहर,  रामनगर,  सीएस ऑफिस,  चतुर्भुज कॉलनी, उगवा, वडाळी देशमुख, केळीवेळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची  नोंद घ्यावी.

३७ जणांना डिस्चार्ज

दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १८, आयकॉन हॉस्पिटल मधुन पाच, स्कायलार्क हॉटेल येथून चार, बिहाडे हॉस्पिटल मधुन तीन,  सुर्यचंद्र हॉस्पिटल मधुन एक, ओझोन हॉस्पिटल मधुन दोन, तर होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या चार जणांना अशा एकूण ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

दोघांचा मृत्यू

दरम्यान आज दुपारनंतर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात मुर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते.  तर अन्य हरिहरपेठ अकोला येथील ७३ वर्षी पुरुष रुग्ण असून या रुग्णासही दि.१८ रोजी दाखल करण्यात आले होते.

१६२४ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १३३९३ (१०९६२+२२५४+१७७) आहे. त्यातील ३४८ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या ११४२१ आहे. तर सद्यस्थितीत १६२४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ