कौशल्य विकास विभागातर्फे ऑनलाईन रोजगार मेळावा चार कंपनी होणार सहभागी


 अकोला,दि.26(जिमाका)- जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शनिवार व रविवार (दि.27 व 28 फेब्रु.) रोजी करण्यात येत आहे. मेळाव्‍यात चार नामवंत कंपनीव्दारे  विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबविली जात आहे

वर्ल्ड वाईड आईल फिल्ड मशीन प्रा.लि. औरंगाबाद या कंपनीत 30 पदाकरीता (ट्रेनी)  दहावी/बारावी व आयटीआयचा कोणताही ट्रेड अशी शैक्षणीक पात्रता असणाऱ्या व वयोमर्यादा 18 ते 30 दरम्यान असलेल्या उमेदवारासाठी, तसेच टेक्नोक्राप्ट इंडीस्ट्रीज लि. अमरावती येथे महिलाकरीता आयटीआय ट्रेड फॅशन डिझाईनर, ट्रेलरिंग व कंटीगचे पाच पदे, वयोमर्यादा 18 ते 30 राहील, तसेच डिप्लोमा इन फॅशन डिझाईनर, टेलरींग व कटींग शैक्षणिक पात्रता असलेल्या व  वयोमर्यादा 21 ते 30 असलेल्या करीता पाच पदे, हेल्पर ट्रेनिंग 10 पदाकरीता किमान दहावी पास  व वयोमर्यादा 18 ते 30 राहिल.

 जे.जे. फाईन्स स्पिंनिग प्रा.लि. बोरगाव मंजू, अकोला येथे आयटीआय फिटर ट्रेड या शैक्षणीक पात्रता असलेल्या व वयोमर्यादा 21 ते 33 करीता दोन पदे, तसेच आयटीआय इलेक्ट्रीयशन ट्रेडच्या दोन पदाकरीता   वयोमर्यादा 18 ते 33, तसेच लिबेन लाईफ सायन्स लि.   येथे आयटीआय फिटर ट्रेडच्या चार पदाकरीता वयोमान 21 ते 33, तसेच आयटीआय इलेक्ट्रीयशन ट्रेडच्या सहा पदाकरीता वयोमर्यादा 18 ते 33 गटाकरीता ऑनलाईन मुलाखात व तत्सम प्रक्रीयेव्दारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 ऑनलाईन मेळाव्‍यात इच्छुक युवक, युवतींनी  मेळाव्‍यातील रिक्‍त पदांची अधिक माहिती करीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईट वर भेट दयावी. तर मेळाव्‍यात सहभागी होण्‍याकरीता (Apply) कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  आपला प्राप्‍त सेवायोजन कार्ड      (Employment Card ) चा आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉग इन मधुन सहभाग (Apply)  नोंदवावा. ज्‍या उमेदवारांनी अद्याप कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.rojgar.mahaswayam.gov.in  या पोर्टलवर  नोंदणी केलेली नाही, त्‍यांनी प्रथम नोंदणी करुन प्राप्‍त युंझर आयडी व पासवर्डच्‍या आधारे रोजगार मेळाव्‍यात सहभाग (Apply)  नोंदवावा, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त प्रांजली यो. बारस्‍कर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ