311 अहवाल प्राप्त, 38 पॉझिटीव्ह, सात डिस्चार्ज

 


अकोला,दि.5(जिमाका)-आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 311 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 273 अहवाल निगेटीव्ह तर 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. सात जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.4) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11746(9512+2057+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 85750 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 83945 फेरतपासणीचे 344  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1461 नमुने होते. आजपर्यंत एकूण 85703 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 76191  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

38 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 17 महिला व 21 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पनज ता.अकोट व रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी चार, अकोट व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, गीता नगर, जठारपेठ, मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित तेल्हारा, व्याळा ता.बाळापूर, हरीपेठ, सिधी कॅम्प, बोरगाव मंजू, बार्शिटाकळी, पुनोती ता.बार्शिटाकळी, डाबकी रोड, राजंदा ता.बार्शीटाकळी, अंबोदा ता.अकोट, मलकापूर, करोडा चोहट्टा बाजार, लहान उमरी, कुंभारी, म्हाडा कॉलनी, रजपूतपुरा, देशमुख फैल व शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

दरम्यान काल रात्री (दि.4) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

सात जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले एक, अशा एकूण सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

746 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11746(9512+2057+177) आहे. त्यातील 338 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10662 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 746 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना