रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 227 चाचण्यात 27 पॉझिटीव्ह

 

अकोला,दि. 23(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 227 चाचण्या झाल्या त्यात 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 आज दिवसभरात अकोला येथे सहा चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे 80 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला आयएमए येथे 19 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 41  चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तेल्हारा येथे 29 व आरोग्य कर्मचाऱ्यांचे 21 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 227 चाचण्यांमधून 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 34 हजार 526  चाचण्या झाल्या पैकी  2460  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले