1157 अहवाल प्राप्त, 288 पॉझिटिव्ह, 89 डिस्चार्ज, एकाचा मृत्यू


अकोला,दि.21(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1157 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 869 अहवाल निगेटीव्ह तर 288  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 89  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर एका रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 13935(11423+2335+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 93687 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 91544 फेरतपासणीचे 370 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1773 नमुने होते. आजपर्यंत एकूण 93381 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 81958   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

288 पॉझिटिव्ह

आज सकाळी 222 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 84 महिला व 138 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील 49, डाबकी रोड येथील 10, खानापूर ता.पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सात, गीता नगर, मलकापूर, जठारपेठ व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा, खिरपुरी  बु., जीएमसी, सिंधी कॅम्प, तापडीया नगर व रामदासपेठ येथील प्रत्येकी चार, बोरगाव मंजू, जिल्हा कोर्ट, बाळापूर, उगवा, मालीपुरा, गोडबोले प्लॉट  व राम नगर येथील प्रत्येकी तीन, वस्तापूर, गजाननपेठ, तुकाराम चौक, अंदुरा, भिम नगर, किर्ती नगर, केदार मंदीर, लहान उमरी, बाळापूर रोड व आश्रय नगर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कपिलेश्वर, अखातवाडा, खोबेरखेड, अपोती खु, अणकवाडी, अंबिकापूर, लाहोरा ता.बाळापूर, दुर्गा चौक, बोरगाव मंजू, भागवतवाडी, जवाहर नगर, बैदपूरा, नयागाव रोड, वाशिम बायपास, उमरी, विझोरा, रजपूतपुरा, हिंगणा रोड, जूने शहर, गायत्री नगर, रिधोरा, खानापूर वेस ता.अकोट, आसेगाव ता.अकोट, अकोला जहॉगीर ता.अकोट, वनी वेताल ता.अकोट, रतनलाल प्लॉट, ज्ञानेश्वर नगर, शिवन नगर, पार्वती नगर, डिएसपी ऑफीस, राऊतवाडी, केशव नगर, सहकार नगर, पत्रकार कॉलनी,शास्त्री नगर, अशोक वाटिका, अकोट फैल, व्दारका नगरी, सातव चौक, रामदोगण प्लॉटनरेंद्र नगर, गंगाधर प्लॉट, रणपिसे नगर, बार्शीटाकळी, वैष्णवी पार्क, पिंपळखुटा ता.बार्शिटाकळी, कान्हेरी सरप, आळदा ता.बार्शीटाकळी, चिंचोली बार्शीटाकळी, राधेनगर, खोलेश्वर लोहिया, मनकर्णा प्लॉट, सूधीर कॉलनी, तिलक रोड व मराठा नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 66 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 22 महिला व 44 पुरुषांचा समावेश आहे. गोरक्षण रोड येथील 11, कौलखेड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी चार, जठारपेठ, केशव नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी तीन, जवाहर नगर, खडकी, सहकार नगर, मुर्तिजापूर व उमरी येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित तुकाराम चौक, राम नगर, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, पिकेव्ही क्वॉटर, बाळापूर रोड, लहान उमरी, हिंगणा रोड, कुरुम, तापडीया नगर, आनंद नगर, जूने शहर, अंबिका नगर, शास्त्री नगर, देशमुख फैल, कोठारी वाटीका, गोविंद नगर, तोष्णीवाल लेआऊट, कृषी नगर, पोलीस हेडक्वॉटर, संजय नगर, अकोट फैल, न्यु भीम नगर, रणपिसे नगर व जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 54 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

89 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 16, आयकॉन हॉस्पीटल येथून सात, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून आठ, अवघाते हॉस्पीटल येथून सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथून 10,  तर होम आयसोलेशन येथून 32 असे एकूण 89 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज दिवसभरात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.  हा व्यक्ती मुर्तिजापूर येथील रहिवासी असून 88 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. 10 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1997 जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 13935(11423+2335+177) आहे. त्यातील 353 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11585 आहे. तर सद्यस्थितीत 1997 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले