रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 107 चाचण्यात 16 पॉझिटीव्ह
अकोला,दि. 12(जिमाका)- कोरोना
संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज
दिवसभरात झालेल्या 107 चाचण्या झाल्या त्यात 16 जणांचा
अहवाल पॉझिटीव्ह
आला, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात तेल्हारा येथे तेल्हारा
येथे 14, मुर्तिजापूर येथे दोन, आयएमए अकोला येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 40 चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर अकोट येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले, बार्शीटाकळी येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले, शासकीय वैद्यकीया महाविद्यालयातून 42 येथे तीन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आले, असे एकूण 107 चाचण्यांमधून 16 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 876 चाचण्या झाल्या पैकी 2180
जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा