रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 396 चाचण्यात 77 पॉझिटीव्ह

 

अकोला,दि. 28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.25) दिवसभरात झालेल्या 396 चाचण्या झाल्या त्यात 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 आज दिवसभरात अकोट येथे 246 चाचण्या झाल्या त्यात 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे 23 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, मुर्तिजापूर येथे 19 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला,  आरोग्य कर्मचाऱ्यांचे 22 चाचण्या झाल्या त्यात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 65 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोला येथे पाच व  अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, असे  एकूण 396 चाचण्यांमधून 77 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 36 हजार 154  चाचण्या झाल्या पैकी  2733  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ