८१४ अहवाल प्राप्त, २३५ पॉझिटिव्ह, ४६ जणांचा डिस्चार्ज

 अकोला,दि.१८(जिमाका)- आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ८१४अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५७९ अहवाल निगेटीव्ह तर २३५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान ४६ जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये २४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  १३१३७(१०७२०+२२४०+१७७)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ९०८५८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ८८७५५ फेरतपासणीचे ३६१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १७४२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९०८०८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ८००८८   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

२३५ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात ८१४ अहवाल प्राप्त झाले.  त्यात सकाळी ४९० तर सायंकाळी ३२४ अहवाल प्राप्त झाले. त्यात सकाळी प्राप्त अहवालानुसार १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ५० महिला व ७४ पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोट येथील २२, मुर्तिजापूर येथील १९, जठारपेठ येथील सात, कौलखेड व मोठी उमरी येथील पाच, राऊतवाडी व दीपक चौक येथील चार, जीएमसी क्वार्टर, आळ्शी प्लॉट, डाबकी रोड येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, जीएमसी होस्टेल, गीतानगर, तापडिया नगर, पार्वतीनगर, खिरपुरी बु., बाळापूर रोड, बिर्ला कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरीत अमान खॉ प्लॉट, न्यू जैन टेम्पल, मासा,गायत्रीनगर, बंजारानगर, खडकी, रिधोरा, उमरी, फिरदौस कॉलनी, आरोग्य कॉलनी, गजानन पेठ, सीओ ऑफिसजवळ, रविनगर, गोरक्षण रोड, लहरीया नगर, बाभुळगाव, हनुमान नगर, जस्तगाव, आरएमओ होस्टेल, रजपुतपुरा, गड्डम प्लॉट, काटेपूर्णा, सावंतवाडी, भागवतवाडी, लहान उमरी, अकोट स्टॅण्ड, कृषी नगर, खोलेश्वर, सातव चौक, नंदाणे मंगल कार्यालयाजवळ, लेडी हार्डींग क्वार्टर, मोरेश्वर कॉलनी, खेळकर नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

तर आज सायंकाळी  १११ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३९ महिला व ७२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात  स्टेट बॅंकेतील १२ जण, बॅंक ऑफ बडोदा, कौलखेड, गोरक्षण रोड, जठारपेठ येथील प्रत्येकी सात जण, सिंधी कॅम्प  व छोटी उमरी येथील प्रत्येकी सहा जण,  डाबकी रोड येथील पाच जण, न्यु राधाकिसन प्लॉट, मोठी उमरी येथील प्रत्येकी चार जण, गितानगर येथील  तीन जण,  जीएमसी, शास्त्री नगर, केशव नगर, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने शहर, राऊतवाडी, सहकार नगर, गुढदी, द्वारका नगरी, पळसोबढे येथील प्रत्येकी दोन तर   उर्वरीत  व्यंकटेश नगर, न्यु भागवत प्लॉट,  तापडिया नगर,  लेडी हार्डींग क्वार्टर,  माधव नगर,  रामनगर,  जयहिंद चौक,  गोकुळ कॉलनी, चिखलगाव, रुस्तमाबाद ता. बार्शी टाकळी, रणपिसेनगर, देवडी,  गंगाधर प्लॉट, न्यु खेतान नगर, तुकाराम चौक,  नवरंग सोसायटी, तारफैल,  रामदास पेठ,  गिरीनगर, सावदे प्लॉट,  गोडबोले प्लॉट,  त्रिवेदी अपार्टमेंट, अनिकत हनुमान आखाडा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,असे दिवसभरात २३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दरम्यान काल (दि.१७) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट्च्या अहवालात २४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांचाही समावेश आजच्या एकूण पॉझिटिव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

४६ जणांना डिस्चार्ज

तसेच आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन,  बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून आठ, सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून चार, ओझोन हॉस्पिटल येथून एक  तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २४ अशा एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१४०७ जणांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १३१३७(१०७२०+२२४०+१७७)आहे. त्यातील ३४६ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या ११३८४ आहे. तर सद्यस्थितीत १४०७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ